शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 जून 2018 (09:55 IST)

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पदावरून हटविले

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता मराठे यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला असून हे सर्व डी एस के प्रकरण झाले यावरून ही कारवाई केली आहे. दिल्लीहून विशेष बैठकीसाठी आलेल्या गुप्ता यांना पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत   आता केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र अधिकारी वर्गावर होत असेलेली कारवाई वादात सापडली आहे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या होत असलेल्या कारवाईवर जोरदार हरकत घेतली आहे.