शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 मार्च 2018 (16:37 IST)

फोर्ब्ज अब्जाधीशांच्या यादीत पतंजली सीईओ आचार्य बालकृष्ण

फोर्ब्जने अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून 110 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस पहिल्या स्थानावर आहेत. तर या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 19व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी अंबानी 20व्या स्थानावर होते. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचे मूल्य 40.1 अब्ज डॉलर्स असल्याचे फोर्ब्जनं म्हटले आहे. विशेष म्हणजे  पतंजली सीईओ आचार्य बालकृष्ण हे ही 6.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असून ते फोर्ब्जच्या यादीत आहेत. याशिवाय यादीत 3.1 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही आहेत.
 
यादीत दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स असून त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर्सची आहे. गुंतवणूक गुरू अशी ओळख असलेले वॉरन बफेट 84 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर असून बर्नार्ड अरनॉल्ट चौथ्या (72 अब्ज डॉलर्स) व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पाचव्या (71 अब्ज डॉलर्स) स्थानावर आहेत.