शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:49 IST)

बेळगाव पोस्ट विभाग गोल्ड बॉण्ड विक्रीत देशात प्रथम

India Post
सॉवरिन गोल्ड बॉण्ड योजनेत बेळगाव पोस्ट विभाग देशात अव्वल ठरला आहे. 3.53 कोटी रुपयांचे गोल्ड बॉण्ड व्रिकी करून बेळगाव विभागाने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विश्वासार्हता व सुरक्षित गुंतवणूक यामुळे ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केली आहे.
 
20 ते 24 जूनदरम्यान सॉवरिन गोल्ड बॉण्ड योजना सुरू करण्यात आली होती. बेळगाव पोस्ट विभागात बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, कित्तूर व रामदुर्ग या तालुक्मयांचा समावेश होतो. एकूण 6 हजार 941 ग्रॅमचे सॉवरिन गोल्ड बॉण्ड विक्री करण्यात आले आहेत. तामिळनाडू येथील तांबारम विभागाने 3 हजार 600 ग्रॅम, तामिळनाडू येथील नाम्कल्ल विभागाने 2 हजार 550 ग्रॅम बॉण्डची विक्री केली आहे.
 
मुख्य पोस्ट कार्यालय सर्वात पुढे
 
या योजनेमध्ये सर्वाधिक वाटा बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयाचा आहे. येथून अंदाजे 2 किलो सोन्याच्या किमतीचे बॉण्ड विक्री झाले आहेत. सॉवरिन गोल्ड बॉण्डमध्ये एक ग्रॅम आजच्या सोन्याच्या किमतीनुसार गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला त्यावेळी असणाऱया सोन्याच्या किमतीप्रमाणे सोने अथवा पैसे दिले जातात.