बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (17:19 IST)

सोने दरात मोठी वाढ

सोन्याच्या दरात विलक्षणीय वाढ झाली असून चांदीचे दर देखील वधारले आहे. सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला असून वर्षभरातील सर्वात उच्चांकी दराची नोंद झाली आहे. एप्रिल डिलिव्हरी गोल्डची किंमत 50 हजाराच्या जवळ पोहोचली आहे. सोन्याचा आजचा भाव 49,540 प्रति 10 ग्राम आहे.तर चांदी 1.29 टक्क्यांनी वाढली आहे. चांदीचा भाव 64,799 प्रति किलोग्रॅम ने झाला आहे. 
मुबंईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,510 रुपये प्रति 10 ग्राम झाला आहे. तर पुण्यात 24 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा दर 50,450 रुपये झाला आहे.