सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:41 IST)

कॉल ड्रॉप करणाऱ्या कंपन्यांना 10 लाखांचा दंड

call drop

कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलणारआहे. यापुढे  कॉल ड्रॉपच्या नियमांचा लागोपाठ 3 महिने भंग करणाऱ्या कंपन्यांना 10 लाखांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली.

नियमभंग करणाऱ्या कंपन्यांकडून एक ते पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याचा सध्या प्रस्ताव आहे. त्यामुळे जर एअरटेल, वोडाफोन, आयडिया सारख्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीनं वाढ करण्यात येईल. सलग तीन महिने कॉल ड्रॉप झाल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.

कॉल ड्रॉप प्रकरणात सर्वाधिक दंड 10 लाख रुपयांचा असेल. कॉल ड्रॉप मोजण्याबद्दल अनेक मुद्दे आहेत. सरासरीमुळे अनेकदा यातील अनेक मुद्दे समोर येत नाहीत. मात्र नव्या नियमांच्या अंतर्गत अनेक मुद्दे विचारात घेतले जाणार असल्याचंही शर्मांनी सांगितलं.