कमी होऊ लागले कॅशलेस व्यवहार
वर्ष 2016, तारीख 8 नोव्हेंबर, संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटांवरून मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आली होती.
नोटाबंदी नंतर डिजीटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. पेमेंट्स काउंसिल ऑफ इंडियाप्रमाणे नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग 40 ते 70 टक्के वाढली आहे. आधीही हा वेग 20 ते 50 टक्के होती. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचा वेग वाढताना दिसला तरी काही महिन्यानंतर यात कमी येऊ लागली आणि लोकं पुन्हा कॅश वापरू लागली.
नंतर या व्यवहारामध्ये चांगलीच कमी येऊ लागली. मागील नोव्हेंबर महिन्यात 67.149 कोटी डिजीटल व्यवहार झाले होते. डिसेंबर महिन्यात हे वाढून 95.750 कोटीपर्यंत पोहचले. तसेच या जुलैमध्ये ही आकडेवारी कमी होऊन 86.238 कोटीपर्यंत आली. रेकॉर्ड्सप्रमाणे आरटीजीएस आणि एनईएफटी ट्रांसफर 2016-17 मध्ये क्रमश: 6 टक्के आणि 20 टक्के वाढले आहेत.