LPG गॅस सिलेंडर महागला
मध्य-पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत त्याची किंमत ३,०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. ही सलग तिसऱ्या महिन्याची दरवाढ असून, याचा फटका हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना बसण्याची शक्यता आहे.
ALSO READ: १ मे पासून महागाईचा भडका! कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; ५ किलोचा सिलेंडरही महागला
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या दरांच्या तुलनेत ही ४० टक्क्यांहून अधिक वाढ आहे. तसेच ही सलग तिसऱ्या महिन्याची दरवाढ आहे.प्रमुख शहरांमधील कमर्शियल सिलेंडरचे नवे दर खालीलप्रमाणे-
९९३ रुपयांच्या वाढीनंतर आता दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये कमर्शियल सिलेंडरच्या किमती ३,००० रुपयांच्या पार गेल्या आहे. मुंबईत ३,०२४ रुपये (९९३ रुपयांची वाढ) तर दिल्लीत ३,०७१.५० रुपये (९९३ रुपयांची वाढ) झाली आहे. तसेच कोलकातामध्ये ३,२०२ रुपये (९९४ रुपयांची वाढ) झाली तर चेन्नईत ३,२३७ रुपये वाढ झाली आहे.
