मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (10:39 IST)

बातमी उपयोगाची, SBI ने नियमामध्ये केले आहेत असे बदल

या आठवड्यात SBIने आपल्या नियमांमध्ये बरेच बदल केले आहेत. हे नियम एटीएम व्यवहार, किमान शिल्लक आणि एसएमएस शुल्काबाबत आहेत. या नियमांमध्ये बँकेने कोणते बदल केले आहेत ते पाहू ...
 
१) स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १ जुलैपासून एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांना दंड आकारला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना (सेव्हिंग खातेधारकांना) एटीएममधून एका महिन्यात ८ विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. विनामूल्य व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल.
 
२) SBI ने १८ ऑगस्ट रोजी ग्राहकांना एक मोठी भेट दिली असून आता बचत खातेधारकांकडून एसएमएस शुल्क बँक घेणार नाही.
 
३) SBI ने एटीएममधून दहा हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम काढण्याच्या नियमातही बदल केला आहे. आता जर तुम्ही SBI एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक पैसे काढले तर तुम्हाला ओटीपीची आवश्यकता असेल. बँकेच्या या सुविधेअंतर्गत खातेदारांना SBI च्या एटीएममधून सकाळी ८ ते सकाळी ८ या वेळेत रोकड काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. बँकेची ही सुविधा केवळ खातेदारांना एसबीआय एटीएममध्ये उपलब्ध असेल. आपण इतर कोणत्याही एटीएममधून रोकड काढल्यास आपण ते पूर्वीसारखे सहज काढू शकता. आपल्याला कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही.
 
४) एसबीआय बचत खातेधारकांकडून किमान मासिक रक्कम ठेवत नसल्यासही शुल्क आकारणार नाही आहे. एसबीआयच्या ४४ कोटीहून अधिक बचत खातेधारकांना ही सुविधा मिळेल. यावर्षी मार्चमध्ये SBI ने जाहीर केले की सर्व बचत बँक खात्यांसाठी आवश्यक मासिक किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य नसणार आहे. याद्वारे बँकेच्या सर्व बचत खातेदारांना शून्य शिल्लक सुविधा मिळू शकेल. याआधी मेट्रो शहरांमधील बचत खातेधारकांना किमान रक्कम म्हणून ३००० रुपये, शहरांमध्ये २००० रुपये आणि ग्रामीण भागात १००० रुपये ठेवणे आवश्यक होते.