शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (17:30 IST)

SBI कडून खातेधारकांना खास भेट; यापुढं नाही आकारलं जाणार....

SBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खातेधारकांच्या दृष्टीनं अनेक नव्या योजना आणि सेवा पुरवल्या जातात. त्यातच आता बँकेकडून (Special gift from SBI)आणखी एक भर टाकण्यात आली आहे. ही भर म्हणण्यापेक्षा बँकेकडून खातेधारकांना दिली जाणारी खास भेटच ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 
 
कारण, ठराविक सेवांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया यापुढं खातेधारकांकडून पैसे आकारणार नसल्याचं बँकेच्याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं. एसएमएस अलर्ट आणि किमान राशीसाठी बँक आकारत असणारे (Special gift from SBI)पैसे यापुढं आकारले जाणार नाहीत. शिवाय अनावश्यक ऍपमुळं होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी म्हणून खातेधारकांनी #YONOSBI ऍपचा वापर करावा, असंही सांगण्यात येत आहे. 
 
खात्याशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर (Special gift from SBI)खात्यासंदर्भातील माहिती पाठवण्यासाठी बँकेकडून यापूर्वी ठराविक रक्कम आकारली जात होती. पण, यापुढं खातेधारकांना ही रक्कम देणं बंधनकारक नसेल.