शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:06 IST)

एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक

st buses
आधीच तुटपुंजा पगार व मर्यादित निवृत्त लाभ मिळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शेकडो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. एसटी महामंडळातील शिपाई ते अधिकारी पदापर्यंतच्या दीडशे ते दोनशे जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
 
शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची कमाई लुटण्यात आली आहे. याप्रकरणी गुंतवणूक कंपनीच्या दोन भागीदारांना भाईंदरमध्ये अटक करण्यात आली असून, लुटीचा आकडा 50 कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
फसवणूक झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्त आहे. 30 ते 35 वर्षांपेक्षा अधिक काळ एसटीमध्ये नोकरी केल्यानंतर हे निवृत्त झाले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.