शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2023 (10:55 IST)

Chicken Price Hike : चिकनच्या दरात वाढ

chicken
चिकन प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महागाई वाढत आहे. आता चिकनचे भाव देखील इतर वस्तूंप्रमाणे वधारले आहे. राज्यासह देशात चिकनच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या चिकनचे दर 260 रुपये किलो आहे. कोंबड्यांची आवक कमी होऊन मागणी वाढल्यामुळे चिकनचे दर वधारले आहे.  
 
गेल्या सहा महिन्यात ही मोठी दर वाढ आहे. गावरान कोंबडीला जास्ती मागणी असल्यामुळे गावरान कोंबडीचे चिकन महाग झाले आहे. 
 
अति उष्णतेमुळे कोंबड्यांचे मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक कमी आणि चिकनची मागणी जास्त असल्यामुळे चिकनच्या किमती 260 रुपये किलो झाल्या आहे. येत्या काळात दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
राज्यात तापमान वाढल्यामुळे पक्ष्यांचे मृत्यूचे दर वाढले आहे.पोल्ट्री व्यावसायिकांच्या पक्ष्यांचे मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit