सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सीएनजी, पीएनजीच्या दरात घट

मुंबई : सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली. महानगर गॅस लिमिटेडने याबाबत निर्णय घेतला. विशेष म्हणजे रविवारी रात्रीपासूनच हे दर लागू होणार आहेत. घरगुती वापर वाढावा आणि वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा वापर वाढवावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची तर पीएनजीच्या दरात २ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणा-या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. पण आता सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये काहीशी घट करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २ ऑक्टोंबरपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना ७६ रुपये प्रतिकिलोच्या दराने सीएनजी मिळेल. दुसरीकडे पीएनजी ४७ रुपयांना मिळेल. सध्या सीएनजी वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच अनेकजण अन्न शिजवण्यासाठी पीएनजीचा वापर करतात. त्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.