शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (16:14 IST)

नव्या वर्षात CNG -PNG स्वस्त होणार

gai gaspipeline
सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हालच आहे. आता कोरोनामुळे देखील चिंता वाढत आहे. आता नव्या वर्षात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या वर्षात सरकार CNG -PNG चे दर कमी करण्याचा विचार करत आहे. 

सध्या वाढत्या महागाईमुळे सर्व वस्तूंचे दर गगनाला भेदले आहे. घरगुती गॅस चे दर देखील वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसावर आर्थिक भार वाढत आहे. आता येत्या वर्षात LPG आणि PNG चे दर कमी होऊ शकतात. या मुळे स्वयंपाकघरातील गॅस चे दर कमी होऊ शकतात. या व्यतिरिक्त विजेचे दर देखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॅचरल गॅसची किमती कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाने एक मसुदा तयार केला असून येत्या काही दिवसात मंत्रालयांना या संदर्भात पत्र पाठविले जाऊ शकते. 
 
 
Edited by - Priya Dixit