गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 29 एप्रिल 2024 (11:56 IST)

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या सध्यास्थितीत असलेल्या किमती

भारतीय ऑइल मार्केटिंग कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या आधारावर किंमतीच्या समीक्षा नंतर रोज पेट्रोल आणि डिजेलचे भाव ठरवते. देशातील सर्व महानगरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थित स्वरूपात आहे. चला जाणून घेऊ या तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमतींची अपडेट 
 
राष्ट्रीय ते कंपनीव्दारा प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट होतात. आज 29 एप्रिलला लेटेस्ट अपडेट नुसार पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये काही कमी जास्त भाव झालेला दिसला नाही. तर आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वारंवार वाढ पाहायला मिळत आहे. पण आता या किंमतींमध्ये देखील कमी भाव दिसत आहे. 
 
कच्च्या तेलाने 90 डॉलर पर्यंत उडी घेतली आहे. जी कमी होऊन 88 डॉलर पर्यंत आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती थोड्या प्रमाणातच कमी झाल्या आहे. ब्रेंट क्रूड 88.70 डॉलर प्रति बैरल आहे. तर WTI क्रूड 83.17 डॉलर प्रति बैरल वर व्यवसाय करीत आहे. तसेच भारतात आज सर्व मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहे. 
 
नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 94.72 रुपये प्रतिलिटर असेल तर डिझेलची किंमत 87.62 रुपये राहील. मुंबईमध्ये पेट्रेलची किंमत 104.21 रुपये प्रतिलिटर राहील तर डिझेलची किंमत 92.15 रुपये प्रतिलिटर राहील. कोलकत्ता मध्ये 103.94 प्रतिलिटर राहील तर डिझेलची किंमत 90.76 रुपये प्रतिलिटर राहील. चेन्नई मध्ये पेट्रोल किंमत 100.75 रुपये राहील तर डिझेलची किंमत 92.34 रुपये प्रतिलिटर राहील. भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीवर आधारित असते. 

Edited By- Dhanashri Naik