1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (12:14 IST)

DA महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 1 जुलैपासून 4 टक्के महागाई भत्ता लागू

Dearness Allowance
राज्यात एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. 1 जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. 
 
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार 1 जुलै 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 42 वरुन 46 टक्के करण्यात यावा. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळेल अशात सरकारच्या तिजोरीवर दर महिन्याला 180 ते 200 कोटी रुपयांचा बोजा पडेल असे सांगण्यात येते. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे.