बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (15:41 IST)

Tata च्या या गाड्यांवर बंपर ऑफर, 2 लाख 30 हजार रुपयांची सवलत

टाटाच्या दोन लोकप्रिय SUV Tata Hexa आणि Tata Harrier या गाड्यांवर बंपर डिस्काउंट मिलत आहे. टाटा कंपनीकडून Hexa वर 2 लाख 30 हजार रुपयांची तर Harrier वर 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. हे ऑफर शहरांवर अवलंबून असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
 
Tata Hexa च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 13.26 लाख रुपये इतकी आहे. यात 2.2 लीटर, 4 सिलिंडर इंजिन असून मॅन्युअल ट्रांसमिशनमध्ये हे इंजिन 320Nm टॉर्कसह, 150bhp ची ऊर्जा निर्माण करतं. तर ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये 400Nm टॉर्कसह 156bhp ची ऊर्जा मिळते.
 
Tata Harrier च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 12.99 लाख रुपये इतकी आहे. ही गाडी सध्या XE, XM, XT आणि XZ या चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. गाडीत 2 लिटरचे डिझेल इंजिन असून सहा स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स आहे.