गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ : डीएसके

“मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर  पहिल्यांदाज डीएसकेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
 
“माझ्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता नसल्याचा अफवा पसरत होत्या. आज माझं संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित आहे. मला माझ्या गुंतवणूकदारांना दिलासा द्यायचा आहे. आम्ही कोणाचीही पैसा बुडवणार नाही, आम्ही सर्वांचे पैसे परत देऊ” असे डीएसके यांनी सांगितले आहे. 

वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिली मुलाखत दिली. मीडिया माझा विक पॉईंट आहे. मात्र याच मीडियात सध्या नकारात्मक बातम्या येत आहेत. आम्ही निगेटिव्ह बातम्यांमुळे अडचणीत आलो आहोत. पत्रकारांनी कृपया लिहिताना थोडं भान ठेवावं, कारण तुमच्या लिहिण्यामुळे मी अडचणीत येतो असं नाही. तर माझ्या अडचणीमुळे अनेकांची अडचण वाढते, मग त्यात गुंतवणूकदार, शेअर होल्डर्स वगैरे सर्व आले, असं डीएसके यांनी सांगितले.