मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

लवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार

ecnomic survey in country soon
मोदी सरकारने  मोठा निर्णय घेत लवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार आहे. या सर्व्हेमुळे देशात रोजगाराची नेमकी स्थिती समोर येईल.

हा सर्व्हे सहा महिन्यात पूर्ण केला जाणार असून, दर पाच वर्षात होणारा आर्थिक सर्व्हे आता दर तीन वर्षांनी केला जाणार आहे. तसं बघता हा देशाचा 7 वा आर्थिक सर्व्हेक्षण असेल. मात्र यात पहिल्यांदा स्वरोजगार मग तो कुठल्याही प्रकारचा का नसावा त्याची गणना केली जाईल आणि पूर्ण देशासमोर हा सर्व्हे मांडला जाईल.

या सर्व्हेमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार करणाऱ्या व्यक्तीची नोंद घेण्यात येणार आहे. जनगणनेप्रमाणे हा सर्व्हे  केला जाणार आहे. यासाठी 12 लाख सर्वेक्षणकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सर्वेक्षण अहवालानंतर रोजगाराची खरी स्थिती स्पष्ट होईल.

या 12 लाख सर्वेक्षणकर्त्यांच्या अहवालाची तपासणी NSSO चे अधिकारी करतील. याकरिता राज्य सरकरच्या आणि MSME च्या अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जाईल. सोबतच  या सर्व सर्व्हेसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.