Vijay मल्ल्याच्या अलिबागमधील 100 कोटींच्या फार्महाऊसवर ईडीचा ताबा
मुंबई: भारतातील बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला सक्तवसुली संचालनालयाने दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याच्या अलिबागमधील सुमारे रु.100 कोटींचा फार्म हाऊस ताब्यात घेतला आहे. विजय मल्ल्या यांचे फार्म हाउस मांडवा येथील समुद्र किनाऱ्यालगत 17 एकरवर पसरलेले आहे.
उद्योगपती विजय मल्ल्या प्रत्यार्पण प्रक्रियेला बळकटी मिळण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) प्रयत्नशील असून, त्यासाठी आयडीबीआय बॅंकेचे नऊशे कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी "ईडी' जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. मल्ल्याविरोधात लंडनमध्ये भक्कम पुरावे उभे करण्यासाठी लवकरात लवकर हे आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्यामुळे लंडनमध्ये आपली बाजू आणखी भक्कम होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.