आता खाद्यतेल महागणार नाही, सरकारनं घेतला मोठ निर्णय
पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. नंतर आता केंद्र सरकारनं खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल आणि तेलबियांची साठवणूक करण्याचा आदेश राज्यांना देण्यात आला आहे. पुरवठा साखळी आणि व्यापार यांना बाधा न आणता आदेशाची अंबलबजावणी करण्याचा आदेश सरकारनं काढला आहे.
खाद्य तेल आणि तेलबिया यांच्या साठवणुकीची मर्यादा तीन महिन्यांनी वाढवली आहे आदेशात साठवणुकीच्या मर्यादेचाही उल्लेख आहे। केंद्रीय ग्राहक मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची या संदर्भात बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची चर्चा केी आणि परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी साठवणूक मर्यादेचा आदेश लागू करावा. हा आदेश लागू करताना पुरवठा साखळी आणि व्यापारात कोणतीही अडचय येणार नाही याची खातरजमा करुन घ्यावी यावर बैठकीत भर देण्यात आला, अशी माहिती मंत्रालयानं दिली.