रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (17:31 IST)

EPFO चा 4 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, व्याजदर 8.1 टक्के करण्याचा प्रस्ताव

पीएफ कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पीएफमध्ये कपात करणाऱ्या EPFO ​​च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफ कर्मचाऱ्यांना यावर्षी फक्त  8.1  टक्के व्याज दिले जाणार आहे. या पूर्वी व्याजदर 8.5 टक्के होता.या निर्णयाला ऑक्टोबर 2021 मध्ये वित्त मंत्रालय ने मान्यता दिली. आता बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिल्यावर आता या सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. आता सीबीटी च्या निर्णयानंतर 2021 -22 साठी EPF ठेवीवरील व्याजदराची माहिती मंजुरी साठी वित्ता मंत्रालयाकडे पाठविली जाईल. या निर्णयामुळे सुमारे 4 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 
 
कर्मचार्‍यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या पगारातील काही भाग कापून पीएफ खात्यात जमा केला जातो. तेवढीच रक्कम त्याच्या कर्मचाऱ्याला या खात्यात जमा करावी लागेल. ईपीएफओ या निधीचे व्यवस्थापन करते आणि या रकमेवर दरवर्षी व्याज देते. आर्थिक वर्ष 1977-78 मध्ये, EPFO ​​ने लोकांना PF ठेवीवर 8  टक्के व्याज दिले. तेव्हापासून ते सातत्याने एवढे किंवा यापेक्षा अधिक आहे.
 
ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने शनिवारी झालेल्या बैठकीत पीएफचे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफ ठेवींवरील व्याज कमी करण्याआधीच, ईपीएफओला कामगार संघटनांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला आहे