शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (19:25 IST)

लॉकडाऊन झालं तरी रेल्वे बंद होणार नाही - मध्य रेल्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पण राज्यांमध्ये लॉकडाऊन झालं तरी सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे नियोजित वेळेनुसार धावतील, असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलं आहे.
 
राज्यात लॉकडाऊनची घोषणा होण्याची चाहूल लागल्यापासूनच मुंबईच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची गर्दी उसळली आहे.
 
या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
 
पण लॉकडाऊन लागला असला तरी लोकांनी घाबरू नये. लोकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये, असं आवाहन
 
सध्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून विशेष रेल्वे देशात धावत आहेत. या नियोजित वेळेनुसार धावतील. लोकांना फक्त कन्फर्म तिकीट असेल तरच रेल्वेत प्रवेश मिळेल, असं सुतार म्हणाले.