1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (21:16 IST)

दुधाच्या दरात घसरण! किसान सभा आक्रमक, राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या 'त्या' आदेशाची होळी

Fall in milk prices Kisan Sabha Aggressive
राज्यात सध्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुधाचे दर हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांवर आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच शासनाच्या आदेशाची राज्यभर होळी देखील करत आहेत. आज राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या 34 रुपये दर देण्याच्या आदेशाची होळी करण्यात आली.
 
दूध दराच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी देखील आक्रमक झाले आहे. किसान सभेनं देखील आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे.
 
 दरम्यान, राज्य सरकारच्या दुध दर समीतीने दुधाला 34 रूपये दर देण्याचा आदेश काढूनही दुधसंघ दर देत नसल्याने आज राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जातेय.. दुधाला 34 रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीने शासन आदेश काढला होता. मात्र, हा शासन आदेश राज्यातील दूध संघ  आणि दुध कंपन्यांनी धुडकवला आहे.
 
त्यामुळं दुधाचे भाव हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या विरोधात राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी दूध संकलन केंद्रांवर आदेशाची होळी करून हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे.