मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:43 IST)

सणासुदीच्या काळात गृहकर्जावर आणखी एक ऑफर, संधी ३१ ऑक्टोबरपर्यंत

जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सणासुदीचा काळ हा योग्य वेळ असू शकतो. वास्तविक, सणासुदीच्या काळात देशातील खाजगी आणि सरकारी बँकांनी गृहकर्जावर अनेक नवीन ऑफर सुरू केल्या आहेत. ग्राहकांसाठी अशीच एक ऑफर भारतातील आघाडीची गृहनिर्माण वित्त कंपनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) ने सुरू केली आहे.
 
काय आहे ऑफर: एचडीएफसीच्या या विशेष ऑफर अंतर्गत, ग्राहक आता 6.70 टक्के व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतात. ही ऑफर कर्जाची रक्कम किंवा रोजगार श्रेणीची पर्वा न करता सर्व नवीन कर्ज अर्जांवर लागू होईल. प्रारंभिक व्याज दर मुख्यत्वे कर्जदारच क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. क्रेडिट स्कोअर जितका जास्त तितका व्याजदर चांगला. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध आहे. एचडीएफसीच्या वेबसाइटनुसार, सध्या गृहकर्जावरील प्रारंभिक व्याज दर 6.75 टक्के आहे.
 
अनेक बँका ऑफर देत आहेत सणांचा हंगाम सुरू झाल्यावर, देशातील अनेक बँकांनी गृहनिर्माण अधिक परवडणारे करण्यासाठी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), आणि कोटक महिंद्रा बँकेने गृह कर्जावरील विविध ऑफर्सची घोषणा केली होती.