फ्लिपकार्टची ‘हायपरलोकर डिलिव्हरी सर्व्हिस’
फ्लिपकार्ट अनेक नवनव्या सेवा देण्याच्या तयारीत आहे. आता कंपनी भारतात ‘हायपरलोकर डिलिव्हरी सर्व्हिस’ सुरु करण्याच्या तयारीत आहे. हायपरलोकल डिलिव्हरी सर्व्हिस म्हणजे अशी सेवा जी ग्राहकांना त्यांच्या घराजवळच्या दुकानातून वस्तू खरेदी करण्याची परवानगी देते. फ्लिपकार्टने प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच किराणा मालाच्या डिलिव्हरीची सेवा बंगळुरु शहरात सुरु केली आहे. सध्या, स्विग्गी जेनी, डुन्झो, उबर कनेक्ट आणि इतर कंपन्याही भारतात हायपरलोकल डिलिव्हरी सर्विस देतात.
ही हायपरलोकल डिलिव्हरी सेवा फ्लिपकार्टच्या अॅपवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टने यासाठी काही स्थानिक गोदामं आणि दुकानदारांशी सहकार्य करार केला आहे. या दुकानांमधून ग्राहकांना फ्लिपकार्टच्या माध्यमातून वस्तू घरपोच मागवता येणार आहेत. सध्या फ्लिपकार्टने ‘स्पेन्सर्स’ आणि ‘विशाल मार्ट’ यांसारख्या साखळी दुकानांसोबत सहकार्य करार केला आहे. मात्र, फ्लिपकार्टने या सेवेबाबत अद्याप जाहीर घोषणा केलेली नाही.