सलग पाचव्यांदा आरबीआयकडून रेपो दरात कपात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनने रेपो दरात पुन्हा एकदा कपात केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. यंदा रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.15 झाला आहे. याआधी रेपो दर 5.40 होता. सलग पाचव्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केली आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट केली होती. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा झाला होता. आता पुन्हा एकदा घट केल्यामुळे नागरिकांना घर किंवा वाहन हप्ता कमी पडणार आहे.
आरबीआयने सलग पाचव्यांदा रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. रेपो दरात कपात केल्याने रिव्हर्स रेपो दरातही कपात होते. यापूर्वीच्या चार बैठकांमध्ये आरबीआयने रेपो दरात कपात केली होती. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग पाचव्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.