गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (11:26 IST)

फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल

फोर्ब्सने 2020 ची 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावे पहिल्यांदाच समाविष्ट झाली आहेत. तर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग 13व्या वर्षी आपले अव्वलस्थान कायम राखले आहे.
 
फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग 13वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी आहेत. अंबानींकडे 88.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे. नुकतेच लॉकडाउनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समूहाच्या जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. अंबानी यांच्यान्ंतर दुसर्याय स्थानी अदाणी सूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी आहेत. अदाणींची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर आहे.
 
तिसरे स्थान एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष शीव नाडर यांनी पटकावले आहे. नाडर यांची संपत्ती 20.4 अब्ज डॉलर आहे. तर चौथ्या क्रमांकावर डी.मार्टचे मालक राधाकिशन दाणी हे आहेत. ते 15.4 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. पाचव्या क्रमांकावर हिंदुजा ब्रदर्सच्या नावाचा समावेश आहे. हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती 12.8 अब्ज डॉलर आहे. सहाव्या क्रमांकावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सारस पूनावाला यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती 11.5 अब्ज डॉलर इतकी आहे. सातव्या स्थानी पालोनजी मिस्त्री आहेत, त्यांची संपत्ती 11.4 अब्ज डॉलर आहे. कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक हे आठव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 11.3 अब्ज डॉलर आहे. तर नववे स्थान गोदरेज कुटुंबाला मिळाले आहे. त्यांची संपत्ती 11 अब्ज डॉलर आहे. तसेच दहाव्या क्रमांकावर स्टील उत्पादक कंपनी आर्सेलर मित्तमले अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती 10.3 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंत लोकांच्या यादीत केवळ तीनच महिलांचा समावेश आहे. यामध्ये ओपी जिंदाल समूहाच्या सावित्री जिंदाल या 19व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 6.6 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर बायोकॉनच्या किरण मुजुमदार शॉ या 27व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 4.6 अब्ज डॉलर आहे. तर यूएसव्हीच्या लीना तिवारी या तीन अब्ज डॉलर संपत्तीसह 47व स्थानी आहेत.