रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (16:44 IST)

भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल- मुकेश अंबानी

4G नेटवर्क तयार करण्यासाठी Jio ला केवळ 3 वर्षे लागली, तर 2G ला 25 वर्षे लागली.
जिओ आल्यानंतर डेटा वापर 30 वेळा वाढला
भारतात लवकरच  5 जी सेवा सुरू होईल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी गुरुवारी डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन वर्ल्ड सिरींज २०२० मध्ये भाषण करताना म्हटले की मला खात्री आहे की भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल. डिजीटल कनेक्टिव्हिटी, क्लाउड कम्प्यूटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, स्मार्ट उपकरण, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स यासारख्या डिजीटल तंत्रज्ञानामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे कणा तयार होईल.
 
टीएम फोरम अंतर्गत आयोजित या जागतिक मालिकेत मुकेश अंबानी म्हणाले की, जर भारताला नेतृत्वाची जागा मिळवायची असेल तर अल्ट्रा हायस्पीड कनेक्टिव्हिटी, परवडणारी स्मार्ट उपकरणं आणि उत्तम डिजीटल applications आणि सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित करावं लागेल.
 
जिओचे कौतुक करताना मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ येण्यापूर्वी भारत 2 जीमध्ये अडकला होता. जिओच्या माध्यमातून देशाला प्रथमच आयपी आधारित नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळाली. उर्वरित कंपन्यांनी टूजी नेटवर्क स्थापित करण्यास 25 वर्षांचा कालावधी घेतला असताना जिओने केवळ 3 वर्षात भारतात 4 जी नेटवर्क स्थापित केले.
परवडणार्‍या उपकरणांच्या बाबतीत भारत खूपच मागे होता. स्मार्टफोन महाग होते आणि फीचरफोन 4 जी तंत्रज्ञानावर कार्य करीत नाहीत. जिओ इंजिनिअर्सनी एक जबरदस्त काम केले आणि JioPhone हे भारताचे पहिले अल्ट्रा किफायतशीर उपकरण केले. महत्त्वाचे म्हणजे की जिओफोनच्या जोरावरच जिओने भारतात प्रथमच ग्रामीण भागात प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
 
जिओच्या डिजीटल applications आणि सोल्युशन्सबद्दल बोलताना अंबानी म्हणाले की जेव्हा डिजीटल कनेक्टिव्हिटी, परवडणारी उपकरणे आणि डिजीटल अ‍ॅप्लिकेशन्स आणि सोल्युशन्स एकत्र जोडली गेली तेव्हा त्याचे परिणाम असाधारण होते. जिओ पूर्वी जे वापरत होते त्यापेक्षा आज लोक 30 पट जास्त डेटा वापरत आहेत. डेटा वापर 0.2 अब्ज जीबी वरून 1.2 अब्ज जीबीपर्यंत वाढला आहे.
 
मुकेश अंबानी यांनी जिओफायबरच्या माध्यमातून दोन हजार शहरे आणि शहरांची 5 कोटी घरे जोडण्याच्या प्रकल्पाचा उल्लेखही केला. जिओ लवकरच भारतात 5 जी सेवा सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.