रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (15:05 IST)

वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी 1 जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 19 रुपयांची वाढ केली आहे. सलग पाचव्या महिन्यात किमतीत वाढ सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल
आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडरचा दर आता 714 रुपये झाला आहे. मुंबईत ग्राहकांना घरगुती
गॅससाठी 684.50 रुपे मोजावे लागतील. मुंबईत गॅस सिलिंडर 19.50 रुपयांनी महागला आहे. घरगुती
गॅस सिलिंडरबरोबरच व्यवसायिक वापराच्या सिलिंडरच्यां किंमतीत 33 रुपयांची वाढ झाली आहे. मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदल इंधन आयातीच्या खर्चात वाढ करतात. 2019 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात 2.28 टक्के अवमूल्यन झाले.