शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (21:57 IST)

जेपीसीच्या मागणीनंतर प्रथमच गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट

gautam adani sharad panwar
अदानी उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी आज ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अमेरिकन संशोधन संस्था हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर वादात सापडलेल्या अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहार आणि स्टॉकमध्ये फेरफार केल्याचा आरोप कॉग्रेससह विरोधक करत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी आदानींची पाठराखण करत हिंडेनबर्गचे नाव यापुर्वी कधी ऐकले नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज गुरुवारी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गौतम अदानी यांनी भेट घेऊन दोघांमध्ये जवळपास दोन तास झाल्याची बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
गौतम अदानी यांच्यावरील आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील पथकाद्वारे संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी चौकशीसाठी बोलावलेल्या या बैठकीमध्ये आपला ‘कोणताही आक्षेप नाही’ असेही पवारांनी म्हटले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor