मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (23:35 IST)

गौतम अदानीं बनले आशियातील सर्वात श्रीमंत, संपत्तीत मोठी वाढ

अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग  बिलियनर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, ते 10व्या स्थानावर पोहोचले आहे. 
 
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती $100 अब्ज झाली आहे. यासोबतच ते जगातील 10 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले  आहे.  
 
ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी $2.44 अब्जच्या वाढीसह यादीत 10 व्या स्थानावर पोहोचले आहे. अदानी $ 100 बिलियनच्या नेटवर्थ संपत्तीसह सेंटबिलियनेअर्स क्लबमध्ये सामील झाले आहे.  
 
100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंट अब्जाधीश म्हणतात. या वर्षात आत्तापर्यंत अदानीच्या एकूण संपत्तीत $23.5 अब्जने वाढ झाली आहे. या यादीतील सर्व लोकांपैकी अदानीच्या मालमत्तेत यावर्षी सर्वाधिक वाढ झाली आहे.  
 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आता ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत.  त्यांची एकूण संपत्ती  $99 अब्ज एवढी आहे. या वर्षात आतापर्यंत अंबानींची संपत्ती $9.03 अब्जने वाढली आहे. 
 
ब्लूमबर्गच्या यादीनुसार, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती $273 अब्ज इतकी आहे.