शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (16:23 IST)

Gokul Dudh Price : म्हैस, गायीच्या दुधाच्या खरेदी दरात दीड रुपयांन वाढ,गाय दूध खरेदी दरात 2 रूपये कपात

Gokul Dudh Price
Gokul Dudh Price:सध्या महागाई वाढत आहे. आता कोल्हापूरच्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हैसच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांन वाढ करण्याचा निर्णय घेतला तर गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांनी कपातीचा निर्णय घेतला आहे. ही माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. मात्र दूध विक्री बाबत अद्याप कोणतेही निर्णय झालेले नाही. रविवारपासून या निर्णयावर अंमलबजावणी होणार असल्याचे ते म्हणाले.

म्हैस दुग्ध उत्पादकांना दूध वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील खासगी व इतर दूध संघाचे गायीच्या दुधाचे दर कमी झाले.  
 
नव्या निर्णयानुसार, म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये 5.5 फॅट ते 6.4 फॅट व 9.0 एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर एस.एन.एफ करीता प्रतिलिटर 51.30 रुपये वरून 52.80 रुपये एक रुपयाने वाढ केली आहे. तसेच गायीच्या दुधामध्‍ये 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दरात 35 रुपयांवरून 33 रुपये करण्यात आले आहे.  .संचालक मंडळाच्‍या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे.


Edited by - Priya Dixit