गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:28 IST)

सोन्याचे भाव 300 रुपयांनी घसरले

सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे भाव 300 रुपयांनी पडून 30,200 रुपये प्रतीतोळा झाले आहेत. सोनारांकडून होत असलेली मागणी घटल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत.

99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 30,200 रुपये आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 30,050 रुपये एवढी आहे. सोन्याबरोबरच चांदीचे भावही 150 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीची किंमत 39,000 रुपये प्रतीकिलो झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी होतील, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सोनं खरेदी करण्यासाठी आणखी थोडे दिवस थांबण्याचा सल्लाही व्यापारी देत आहेत.