शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर जवळपास आठवड्याभरानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा चढ्या आहेत. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याचा भाव 32,230 रुपये प्रति दहा ग्रामवर होता. परदेशात सोन्याची मागणी घटली असली तरी देशात मात्र लग्नसराईमुळे स्थानिक सोनारांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसतेय.  केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 1070 रुपयांची वाढ झालीय.
 
23 एप्रिल रोजी दिल्लीत सोन्याच्या किंमती 31,280 रुपये प्रति दहा ग्रामवर होत्या. 24 एप्रिल रोजी हा आलेख चढता राहात किंमती 32,075 रुपयांवर दाखल झाल्या. 25 एप्रिल रोजी दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा 225 रुपयांनी वाढून 32,450 रुपये प्रति दहा ग्रामवर दाखल झाली. चांदीची किंमतही 200 रुपयांनी वाढ होऊन 40,000 रुपये प्रति किलोवर पोहचलीय.