शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पुन्हा एकदा सोने, चांदीचे भाव वाढले

gold and sliver rate increased
सोन्याने 37 हजारचा आकडा पार केला आहे.  सोने प्रति तोळा 500 ते 700 वाढले आहे आणि हे भाव पुढील काही दिवसात असेल वाढतील. अमेरिकेच्या आणि दक्षिण कोरियाच्या मधील वाद सोने वाढीसाठी कारणीभूत आहे मात्र याचा परिणाम सोने खरेदीवर होणार नाही असे मत व्यक्त होत आहे. दिल्लीमध्ये याची किंमत १ हजार ११३ रुपयांनी वाढली. सोन्याचा भाव ३७ हजार ९२० रुपये आहे. पहिल्यांदाच सोन्याचा भाव इतक्या स्तरावर पोहोचल्याचे तज्ञ सांगत आहेत. ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 
 
चांदीच्या दरामध्ये ६५० रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचा दर ४३ हजार ६७० रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे. सोमवारी सोना चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत होती. पण सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १६३ रुपयांनी घसरून ३६ हजार ८०७ रुपये झाले होते.