गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (17:58 IST)

Gold Price Today: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोने आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 9512 रुपयांनी स्वस्त

भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 30 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली  (Gold Price Today 30 December 2021). त्याच वेळी, चांदीच्या किमतीतही घट झाली आहे (Silver price Today 30 December 2021 दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात केवळ 98 रुपयांची घट नोंदवण्यात आली. त्याचबरोबर आज चांदीचा भाव 699 रुपयांनी घसरला.
जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे?
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 98 रुपयांनी किरकोळ घसरून 46,688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता  
सोने आता त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 9512 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. सोनने ऑगस्ट 2020 मध्ये सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.