बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (12:12 IST)

Gold Price Today: सोन्यात घसरण,सोनं 9500 रुपयांनी स्वस्त,जाणून घ्या आजचा दर

Gold/Silver Price: मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा  सोन्याची किंमत 0.1 टक्के म्हणजे 48 रुपये प्रति 10 ग्रॅम कमी झाली.सोन्याच्या किंमतीत चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण झाली आहे.
 
आज सोनं मर्यादित श्रेणीत व्यवहार करत आहेत. मंगळवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव 0.1 टक्के किंवा 48 रुपये प्रति 10 ग्रॅम कमी झाला. सोन्याच्या किंमतीत चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण झाली आहे.तर डिसेंबर वायदा चांदीचे भाव 0.24 टक्के किंवा 149 रुपये प्रति किलो कमी झाले. भारतात, फेड टेपरिंग टाइमलाइन वरील अनिश्चितता आणि मौल्यवान धातूवरील डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचे भाव एका महिन्याच्या नीचांकावर आहेत.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात, डॉलरचा निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकाजवळ स्थिर राहिल्याने आज सोन्यात घसरण झाली, तर गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण चलनवाढीच्या आकडेवारीच्या आधी सावधगिरी बाळगली.
 
14 सप्टेंबर 2021 रोजी नवीन सोने-चांदीची किंमत-
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मंगळवारी, ऑक्टोबर वायदा सोने 48 रुपयांनी घसरून 46,860 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.आंतरराष्ट्रीय बाजारात  गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,791.16 डॉलर प्रति औंस झाले.तर डिसेंबर वायदा चांदीचा भाव 149 रुपयांनी घसरून 63,150 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 0.3 टक्क्यांनी घसरून 23.65 डॉलर प्रति औंस झाले.