सोन्याच्या दरात घट, चांदीतही मोठी घसरण
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर प्रति तोळा ४० हजार रूपयांच्या जवळ गेलेल्या सोन्यांच्या दरात घट होताना दिसत आहे. चांदीच्याही दरांत मोठी घसरण झाली आहे. सोन्याची किंमत बुधवारी ०.२६ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या आठवड्यात सोनं ३९२७८ रूपयांवर गेलं होतं. बुधवारी प्रति दहा ग्रॅमला १७३० रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमला ३८,१५४ रूपये झाली आहे. रुपयाला मिळालेलं बळ आणि मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.
सोन्याप्रमाणे चांदीचे दरही कमालीचे घसरलेत. चांदीच्या किमतीत ०.२३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. चांदीच्या दरांत प्रतिकिलो ३८०० रूपयांनी घट झाली आहे. बुधवारी चांदीची किंमत प्रतिकिलो ४७, ६८६ रूपये आहे. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो ५१,४८९ रूपये होती.