1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:09 IST)

सोन्याचे भाव झाले कमी, चांदीच्या दरात मात्र वाढ

Gold prices
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या मंदीमुळे सोन्याचे भाव कमी झाले. सोन्याचे दर ५० रुपयांनी पडून ३१,२०० रुपये प्रती १० ग्रॅम झाले आहेत. सोन्याचे भाव कमी झाले असले तरी चांदीचे दर मात्र वाढले आहेत. चांदीचे भाव १५० रुपयांनी वाढून ३७,८५० रुपये प्रती किलो झाले आहेत. सोनं व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत.
 
दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३१,२०० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३१,०५० रुपये प्रती तोळा आहेत. सोमवारी सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले होते. पण ८ ग्रॅम सोन्याच्या विटांचे दर २४,५०० रुपयांवर कायम आहे.