रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

भाग्य उजळायचे असेल तर मंगळवारी अमलात आणा हे 10 उपाय

धर्म आणि ज्योतिष्यानुसार मंगळवार हनुमानाचा अत्यंत प्रिय दिवस आहे. म्हणून या दिवशी मनापासून हनुमानाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. यासोबतच मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात. तर आपणही आपले भाग्य उजळवू इच्छित असाल तर मंगळवारच्या दिवशी अमलात आणा हे 10 सोपे उपाय:
 
* हनुमान मंदिरात दर्शनासाठी जावे.
* हनुमानाला तयार विडा अर्पित करावा.
* मंगळवारी हनुमानाची पूजा-अर्चना करून ध्यान केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव दूर होतो.
* 'ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम:' मंत्र उच्चारणासह घरातून बाहेर पडावे.
* लाल वस्त्र धारण करावे किंवा लाल कपडा जवळ ठेवावा.
* हनुमानाच्या मंदिरात लाल फूल अर्पित करावे.
* घरातून निघण्यापूर्वी मधाचे सेवन करावे.
* या दिवशी काटा, चाकू, कात्री, किंवा इतर धारदार वस्तू खरेदी करू नये.
* बजरंगबलीला गूळ आणि चण्याचं नैवेद्य दाखवावं.
* बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी 108 वेळा खालील मंत्र जपावा.
 
मंत्र- 'ॐ श्री हनुमंते नमः' किंवा 'ॐ रामदूताय नम:', यातून कोणत्याही एका मंत्राची माळ प्रती मंगळवारी जपावी.