1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2024 (17:29 IST)

दोन महिन्यांत सोनं 11000 रुपयांनी महागले

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे,अवघ्या 2 महिन्यात सोन्याचे दर 11 हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात सोनं वधारलं आहे.सोन्याचा भाव दोन महिन्यांत वाढला आहे. 
 
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, 23 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 16 एप्रिल रोजी, IBJA वेबसाइटवरच सोन्याची किंमत 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम दर्शविली आहे. याचा अर्थ 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सोन्याचे दर 11,300 रुपयांनी वाढले आहेत.

सध्या इराण आणि इस्त्राईलच्या युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात वाद होत असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. 2024 च्या सुरुवातीपासूनच सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदी देखील उंच झेप घेत आहे.   2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत चांदीचे दर सुमारे 17 हजार रुपयांनी वाढले आहेत. 23 फेब्रुवारीला चांदीचा दर 69,653 रुपये प्रति किलो होता.16 एप्रिल रोजी चांदीचा भाव 86,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अशाप्रकारे पाहिले तर चांदीचा दर 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 16,847 रुपयांनी वाढला आहे.भविष्यात देखील हा ट्रेंड कायम असणार.असे तज्ज्ञ सांगतात. 
 
Edited By- Priya Dixit