शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (11:30 IST)

दिलासादायक बातमी ! पेट्रोल ,डिझेलच्या किमतीत घट

आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.49 रुपये आहे तर डिझेलची किंमत 88.92 रुपये प्रति लीटर आहे.
मुंबईत पेट्रोलची किंमत 107.52 रुपये आणि डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लीटर आहे.

सरकारी तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाला असून जनतेला दिलासा मिळाला आहे.आज पेट्रोलची किंमत 14 ते 15 पैशांनी कमी झाली आहे,तर डिझेलची किंमत 15 ते16 पैशांनी कमी झाली आहे.तथापि,आताही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे.आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.49 रुपये आहे तर डिझेलची किंमत 88.92 रुपये प्रति लीटर आहे.मुंबईत पेट्रोलची किंमत 107.52 रुपये आणि डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लीटर आहे.कोलकातामध्ये पेट्रोल 101.82 रुपये तर डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर आहे.चेन्नईमध्ये पेट्रोल 99.20 रुपये लिटर आणि डिझेल 93.52 रुपये लिटर आहे.
 
मध्य प्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,तेलंगणा,कर्नाटक,ओडिशा,जम्मू -काश्मीर आणि लडाख येथे पेट्रोलची किंमत 100 पार आहेत.मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. 
 
पेट्रोल आणि डिझेलची किंमत आपल्या शहरात किती आहे हे आपण SMS द्वारे जाणून घेऊ शकता.हे दर जाणून घेण्यासाठी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार,RSPआणि शहराचा पिनकोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो आपल्याला  IOCLच्या वेबसाइटवरून मिळू शकतो.
 
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 पासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईझ ड्युटी,डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 
या प्रमाणांच्या आधारावर तेल कंपन्या दररोज पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. ते किरकोळ किमतीत पेट्रोल स्वतः ग्राहकांना विकतात जे कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर असत. हा दर पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्ये देखील जोडला जातो.