बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (10:43 IST)

देशातील रोजगार निर्मितीला पुन्हा वेग : EPFO च्या खातेधारकांच्या संख्येत वाढ

कोरोनामुळे अनेको लोकांचे रोजगार गेले.अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या.त्यामुळे देशात बेरोजगारीची पातळी वाढली होती परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रोजगाराच्या संधी मिळू लागल्या आहे.देशात रोजगारनिर्मितीनं पुन्हा वेग धरला आहे.
 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत जून महिन्याची आकडेवारी बघता रोजगार  प्रमाणांत वाढ झालेली आहे .जून महिन्यात EPFO च्या खातेधारकांमध्ये 12.83 लाखांनी वाढ झाली आहे.त्यामुळे आता देशाचा आर्थिक गाडा पुन्हा रुळावर येण्याच्या मार्गावर आहे.
 
मे महिन्यात जून महिन्याच्या पेक्षा खातेधारकांची संख्या कमी होती.जून मध्ये खातेधारकांची संख्या 5.09 लाखांनी वाढली जून मध्ये खातेधारकांची एकूण संख्या 12.83 झाली त्यापैकी 8.11 लाख लोकांची EPFO मध्ये प्रथमच नोंद झाली आहे.काही लोकांनी नव्या कंपनीत कामाला सुरु केल्याचे समजत आहे. तर जून महिन्यात 4.73 लाख लोकांनी EPFO ची सदस्यता बंद केली .त्यामुळे आता देशात रोजगार निर्मितीला पुन्हा वेग आला आहे.