गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (19:48 IST)

SBI Platinum Deposits: मुदत ठेवींवर 6.20 टक्के व्याज दर मिळवा, 14 सप्टेंबरपर्यंत संधी

भारतीय स्टेट बँकेने 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम (SBI Platinum Deposit Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, एसबीआय रिटेल ठेवीदारांना 0.15 टक्के पर्यंत अतिरिक्त व्याज मिळेल. ही योजना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. योजना 15 ऑगस्ट रोजी सुरू झाली आणि 14 सप्टेंबर रोजी संपेल.
 
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि म्हटले की, “प्लॅटिनम डिपॉझिटसह देशाचे स्वातंत्र्य साजरे करण्याची वेळ आली आहे. एसबीआयच्या सहकार्याने मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींचा लाभ घ्या. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असेल.
 
SBI ग्राहक या योजनेअंतर्गत 75 दिवस, 75 आठवडे (525 दिवस) आणि 75 महिने (2250 दिवस) अतिरिक्त व्याज मिळवू शकतात. ही ऑफर घरगुती किरकोळ ग्राहकांना तसेच नॉन-रेजिडेंट एक्सवटर्नल और नॉन-रेजिडेंट ऑर्डनरी अकाउंट होल्ड2रांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींसाठी उपलब्ध असेल.
 
सामान्य ग्राहकांसाठी प्लेोटिनम डिपॉजिट्स 
75 दिवस - 3.95 टक्के (वर्तमान दर - 3.90 टक्के)
525 दिवस - 5.10 टक्के (वर्तमान दर - 5 टक्के)
2250 दिवस - 5.55 टक्के (वर्तमान दर - 5.40 टक्के)
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्ले.टिनम डिपॉजिट्स
75 दिवस - 4.45 टक्के (वर्तमान दर - 4.40 टक्के)
525 दिवस - 5.60 टक्के (वर्तमान दर - 5.50 टक्के)
2250 दिवस - 6.20 टक्के