मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (11:29 IST)

चांगली बातमी !सोन्या चांदीच्या किमतीत घसरण

आज देशांतर्गत बाजारात सोन्याचे वायदे भाव वाढले पण चांदी स्वस्त झाली. भारतीय बाजारात सोन्याची किंमत चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. MCX वर,ऑक्टोबर सोन्याचा वायदा 0.15 टक्के किंवा 68 रुपये वाढून 46,030 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये MCX वरील सोन्याचे वायदे 1.3 टक्क्यांनी घसरले आहेत. चांदीची दर 0.14 टक्क्यांनी म्हणजेच 86 रुपयांनी घसरली.चांदीची दर 62550 रुपये प्रति किलो ग्रॅम होती. गेल्या तीन सत्रात चांदीच्या किमतीत 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. पिवळी धातू गेल्या वर्षीच्या उच्चांकीपेक्षा  (56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम).10,150 रुपयांनी कमी झाली आहे.मजबूत अमेरिकन डॉलर आणि यूएस जॉब डेटामुळे गेल्या दिवसांमध्ये पिवळ्या धातूच्या किमतीत घट झाली आहे.
 
गुंतवणूकदारांसाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना
गुंतवणूकदारांसाठी फक्त पाच दिवसांसाठी (9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट) खुली आहे.म्हणून जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर उशीर करू नका. त्याच्या विक्रीवरील नफ्याला आयकर नियमांनुसार सूटसह आणखी बरेच फायदे मिळतील.सरकारकडून गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीसाठी 2021-22 या आर्थिक वर्षाची ही पाचवी मालिका आहे. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना मे ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये जारी होणार. 
 
योजनेअंतर्गत आपण प्रति ग्रॅम 4,790 रुपयांना सोने खरेदी करू शकता. जर गोल्ड बॉण्ड्सची खरेदी ऑनलाईन केली गेली तर सरकार अशा गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट देते. गोल्ड बॉण्ड्सचा परिपक्वता कालावधी आठ वर्षांचा असतो आणि त्याला दरवर्षी 2.5 टक्के व्याज द्यावे लागते. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये देशाची सोन्याची मागणी 35 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 446.4 टनावर आली.