सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

'या' प्रकल्पाला मिळाली केंद्राची मान्यता

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. मूळ ५४ हजार ७७७ कोटी रुपयांपैकी ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक उपसमितीने मंजुरी दिली आहे.

गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिकेचे विस्तारीकरण, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका आणि १९१ वातानुकूलित लोकल यासह इतर प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे चौपट क्षमता वाढवून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील प्रवाशांना विशेष लाभ मिळणार आहे.