सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (12:19 IST)

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल कॉफी मशीन

जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. कंपनीने त्याची किंमत 49.99 लाख रुपये ठेवली आहे. नवीन अॅडिशन अगदी लक्झरी आणि स्टाइलिश तयार करण्यात आले आहे. ऑडी इंडियाच्या मते ए 6 च्या या नवीन अॅडिशनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहे. मनोरंजनासाठी मागील सीटवर बसणार्‍या माणसासाठी 25.65 सेमी टचस्क्रीन टॅबलेटची सुविधा आणि मोबाइल कॉफी मशीन एस्प्रेसो उपलब्ध आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख, राहील आन्सरी म्हणाले की हे नवीन वैशिष्ट्ये नवीन पिढीसाठी जोडण्यात आले आहे.