बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले

जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. जीएसटी आणि सरकारने गॅस अनुदानातही घट केल्या दर वाढले आहेत. जीएसटी लागू होण्याआधी अनेक राज्यांना एलपीजीसाठी टॅक्स द्यावा लागत नसे. काही काही राज्यांमध्ये यावर 2 ते 4 टक्के व्हॅट लागत होता. पण आता एलपीजी जीएसटीच्या 5 टक्के स्लॅबमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे एलपीजीच्या किंमतीत 12 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय जूनपासून गॅस अनुदानात केलल्या कपातीचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. अशाप्रकारे ग्राहकांवर पडणाऱ्या दुहेरी दबावामुळे एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांपर्यंत वाढू शकते.