ग्राहकांना दिली स्टेट बँक ऑफ इंडियाने ने महत्त्वाची माहिती

Last Modified बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (10:38 IST)
नव्या नियमानुसार कर आकारण्यात येणार असल्याचं त्यात सांगितलं आहे. परदेशात पैसे पाठवल्यास त्यावर कर आकारण्याबाबत केंद्र सरकारने नियम केला आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही परदेशात राहणाऱ्या मुलांना, नातेवाईकांना पैसे पाठवत असाल तर त्यावर 5 टक्के टीसीएस आकारला जाईल. फायनान्स अॅक्ट 2020 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिबरलाइज्ड रेमिटेंस स्कीम अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला टीसीएस द्यावा लागेल.

सरकारने या प्रकरणी सूटही दिली आहे. ज्यात परदेशात पाठवण्यात येणाऱ्या सगळ्याच पैशांवर हा कर लागू होणार नाही. जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी 7 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे पाठवत असाल तर टीसीएस लागू होत नाही. तसंच शैक्षणिक कर्ज 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 0.5 टक्के टीसीएस लागू असेल. कोणत्याही टूर पॅकेजसाठी परदेशात पाठवण्यात येणाऱ्या रकमेवर टीसीएस आकारता येणार नाही.

यासाठी बनवावा लागला नियम
सरकारला हा नियम आणण्याची गरज का पडली यावर केसीसी ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन शरद कोहली यांनी सांगितलं की, परदेशात अनेक प्रकारे टीडीएस कापला जातो. भेट, उपचार, संपत्तीमध्ये गुंतवणूक, नातेवाईकांना मदत, दवाखान्यात जमा करायची रक्कम या सगळ्यावर टीडीएस लावला जात नसे. या सगळ्यावर आरबीआयच्या एलआरएस अंतर्गत टीडीएसमध्ये सूट मिळाली आहे. वास्तवात, कुणीही भारतीय नागरिक आरबीआयच्या एलआरएस अंतर्गत प्रत्येक वर्षी 2.5 लाख डॉलर परदेशात
पाठवू शकतो. या पैशाला टॅक्सच्या अंतर्गत आणण्यासाठी
टीसीएस घेण्याचा नियम बनवला गेला आहे. यामध्ये अनेक प्रकारची सूट दिली गेली आहे. याव्यतिरिक्त सगळ्यांना 5 टक्के टीसीएस देणे अनिवार्य आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या ...

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?
”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण ...

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ...

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड
बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)चा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ...

अजित पवार यांच्या सहकारी बँक प्रकरणी अडचणी वाढवण्यात भाजपचा ...

अजित पवार यांच्या सहकारी बँक प्रकरणी अडचणी वाढवण्यात भाजपचा हात आहे का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप झालेल्या राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळा ...