SBI ग्राहकांना महत्त्वाची सूचना जाहीर! वाचा
जर तुमचे एसबीआयमध्ये बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते असेल, तर १ ऑक्टोबरपासून तुमच्यासाठी एक नियम बदलणार आहे. तुम्ही चारपेक्षा जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास, तुम्हाला शुल्क आकारले जाईल.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयने आपल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खातेधारकांसाठी सेवा शुल्कात सुधारणा केली आहे. बँकेने शाखांमार्फत रोख रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. हे बदललेले नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील. ही खाती प्रामुख्याने समाजातील गरीब घटकांसाठी आहेत, जेणेकरून त्यांना कोणत्याही शुल्काच्या किंवा फीच्या ओझ्याशिवाय बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल.
एसबीआयच्या अपडेटनुसार, १ ऑक्टोबर २०२६ पासून, महिन्यातील पहिल्या चार मोफत पैसे काढण्याच्या व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ₹१५ अधिक जीएसटी शुल्क आकारले जाईल. यापूर्वी, डिजिटल व्यवहार वगळता, पहिल्या चार मोफत व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ₹१५ + जीएसटी शुल्क आकारले जात होते. पहिल्या चार मोफत व्यवहारांची गणना करताना डिजिटल व्यवहारांची गणना केली जात नव्हती. तथापि, एसबीआयच्या सुधारित नियमांनुसार आता ही सूट काढून टाकण्यात आली आहे.
Edited By- Dhanashri Naik
